Paradise Fiji

Wild adventure Kula park of Fiji

Beautiful marine drive of Fiji

Latest Posts

Wednesday 18 November 2020

Diwali Preparation

Priya

Sunday 11 October 2020

फिजीमधला मरीन ड्राईव्ह

Priya

 भारतामधला मुंबई चा मरीन ड्राईव्ह तर सगळ्यांनीच बघितला असेल.. पण भारताबाहेर पण तितकाच सुंदर किंबहुना त्याहीपेक्षा सुंदर असा मरीन ड्राईव्ह बद्दल तुम्हांला माहित आहे काय.. 


आज आपण तोच मरीन ड्राईव्ह बघणार आहोत तो म्हणजे फिजीमधला मरीन ड्राईव्ह.. आमच्या घरापासून जेमतेम 15 मिनिटाच्या अंतरावर असणारा हा मरीन ड्राईव्ह इथल्या भाजीमार्केट च्या जवळच आहे.. त्यामुळे आठवड्यातून एकदा तो नेहमीच व्हिसिट होतो.

स्वच्छ आणि सुंदर अशा या मॅरीन ड्राईव्ह वर गर्दी नेहमी तुरळक च असते.. पण सायंकाळी 5 नंतर जेव्हा इथले वर्किंग hours संपतात.. त्यानंतर सायंकाळी walk साठी, जॉगिंग साठी आणि सगळ्यात भारी असा सनसेट एन्जॉय करण्यासाठी भरपूर लोक येतात.

मरिनड्राइव्ह वर भरपूर बेंचेस आणि व्यायामासाठी equipment पण ठेवलेले आहेत. आजूबाजूला एकही स्टॉल किंवा दुकान आढळून येणार नाही त्यामुळेच मॅरीन ड्राईव्ह खुप स्वच्छ असावा.. लंचब्रेक मध्ये किंवा ऑफिस टाइम नंतर लोक takways घेऊन येता आणि इथे ते एन्जॉय करता.

माझा 2 वर्षाचा मुलगा त्या मरीन ड्राईव्ह ला स्विमिंग पूल च समजतो आणि त्यामध्ये वस्तू फेकून त्या डुबताय कि तरंगताय हे त्याला बघायचं असतं म्हणून आम्ही मरीन ड्राईव्हला जाताना काहीच घेऊन जात नाही. तरी त्याने एकदा त्याचा बॉल फेकला होताच.. पण तेव्हा ओहोटी ची वेळ असल्यामुळे
पाणी ओसरलेल होत सो त्याच्या पप्पा तो बॉल काढू शकले.

माझी फिजीमध्येच एक मैत्रीण झाली ती प्रॉपर फिजीमधलीच होती पण तिचे पंजोबा हे भारतीय होते.. ते जेव्हा इथे आले इथेच सेटल झाले इथल्याच मुलीशी लग्न केल आणि त्यांच्या पासून च्या पुढच्या पिढीला इंडोफिजियन म्हणतात.

फिजीमधल्या लोकसंख्येपैकी 40% लोक ही इंडोफिजियन आहेत म्हणजे भारतीय आहेत. मद्रास, बिहार, गुजराथ या राज्यातले लोक इथे जास्त आहे.. मद्रास च नाव आता चेन्नई झाल असलं तरी ते अजूनही मद्रास म्हणूनच ओळखता.

पूर्वज जरी मद्रासी असले तरी त्यांच्या आताच्या पिढीला मद्रासी बोलता वगैरे येत नाही. इनफॅक्ट त्यांना मद्रास special इडली डोसा ही बनविता येत नाही.. माझ्या मैत्रिणीच्या घरच्यांना ते खायचा होत.. सो मी त्यांना ते खाऊ घातला.. आणि त्यांना ते खुप आवडल.

आम्ही जेव्हा मरीन ड्राईव्हला जातो तेव्हा पंजाबी ड्रेस, किंवा कुर्ता leggies घातलेली असते किंवा आमच मराठीतलं बोलणं ऐकून आजूबाजूचे लोक विचारतात.. आप कहासे हो? Nd त्यांना जेव्हा सांगतो इंडिया.. तेव्हा ते खुप आनंदी होतात.. इंडियामे कहासे.. अस विचारतात.. आणि मग त्यांनी इंडियाबद्ल जेजे ऐकलं ते ते विचारतात.. एकदा मला एक शाळेतला मुलगा भेटला आणि तो विचारतो कि आप शाहरुख खान, सलमान खान से मिले हो क्या.. उनका घर देखा हे क्या?? इकडे ही बॉलीवूड movies सॉंग्स खुप बघतात.. रेडिओ वर सुद्धा हिंदी गाणे लागतात.. बॉलीवूड च्या news इथले लोकही खुप आवडीने बघतात.

त्यानी बघितलेला इंडिया म्हणजे फक्त movies, tv सिरिअल्स मध्ये बघितलेला इंडिया.. सो ते movies ला follow करतात.. आणि हो इथे हिंदी बोलतात हं.. इथली हिंदी शब्द थोडे थोडे वेगळे आहेत.. त्यांना थोडा बिहारी, गुजराथी, मद्रासी touch आहे... पण हिंदी बोलतात... जसं कि बिहान म्हणजे उद्या, गौड म्हणजे पाय अस काहीस.

फिजीमधला मरीन ड्राईव्ह आणि फिजीमधल्या अशाच गमतीजमती बघण्यासाठी माझ्या फिजी मधला इंडिया या चॅनेल ला नक्की भेट दया.

 

Tuesday 22 September 2020

फिजीमधला adventure पार्क

Priya

 फिजीमध्ये आल्यावर कुला पार्क ची advertisement बघितली तेव्हाच ठरवलं होत कि जायचं तिथे...पण मुलगा लहान होता तो एन्जॉय करू शकणार नाही म्हणुन जाण्याचा प्रोग्राम पुढे ढकलला नंतर कोरोना मुळे पार्क 3-4 महिने बंद होता.. सो आता चालू झाला आणि आम्ही फायनली कुला पार्क ला गेलो. 

   


सुंदर हिरव्यागार जंगलात कुला पार्क होता. एन्ट्री करताच तिथे सुंदर रंगबेरंगी पोपट, हिरव्या कलर च्या शेड्स असलेल्या घोरपडी आणि लांबलचक साप होते.. माझ्या 2 वर्षाच्या मुलाने ते पहिल्यांदाच बघितलेलं.. तस त्याने कार्टून्स मध्ये बुक्स मध्ये त्यांना बघितलेलं होताच.. पण प्रत्यक्षात बघण्याचा आनंद काय असतो तो मला त्याच्या चेहऱ्यावर दिसला... स्नेक, इग्वाना,ग्रीन पॅरेट्स अस म्हणत तो इकडून तिकडं पळत होता.
    
त्यांनतर तिथला स्टाफ आम्हाला म्हणाला would u like to hold them??
मग तर आमचा आनंद द्विगुणित झाला.. नवऱ्याने इग्वाना हातावर घेताच तो तुरुतुरु शर्ट वर चालत खांद्यावर जाऊन बसला. आणि मस्त टकमक बघत होता.. माझा मुलगा हर्ष ने ही त्याला स्पर्श करून बघीतला.. आणि तो शांत आहे हे पाहून खुप हिम्मत करून मी पण त्याला हातावर घ्यायचं ठरविलं आजूबाजूला लहान लहान मूल न घाबरता घेत होती इग्वानाला... ते पाहून हिम्मत केली मी पण..सुरुवातीला जोरात किंचाळी बाहेर पडतापडता वाचली आवरलं स्वतःला .. इग्वाना पण मस्त शांत बसला हातावर.. पटकन फोटो काढायला लावला नवऱ्याला.. मी हातावर घेतलंय हे पाहून हर्ष पण आनंदी झाला ग्रीन ग्रीन करून मला त्याचा रंग सांगू लागला.

तसाच तुषार ने सापाला पण हातावर घेतलं.. actually मीच म्हटलं घ्या घ्या.. आम्ही जेव्हा खतरों के खिलाडी बघायचो तेव्हा ते म्हणायचे हे सेलिब्रिटी लोक किती घाबरता.. मग म्हटलं आता बघूच आपण हे घाबरता कि नाही.. पण त्यांनी खरंच घेतला हातावर सापाला ते पण न घाबरता मी फक्त बोट लावून बघीतला खुप थंड मऊ मऊ आणि गुळगुळीत होता तो.

पुढे आम्ही म्युझिअम बघितली तिथे सुंदर फिशेस आणि कोरल view होता. खुप सुंदर सुंदर शंक शिंपले ठेवली होती जी फिजीमधल्याच समुद्रातील होती. एक मोठ्या इग्वानाची प्रतिकृती होती.कारण इग्वाना ही फिजीचे नॅशनल ऍनिमल आहे.. त्यांच्या सुंदर कलर प्रमाणे त्यांच् खाण सुद्धा खुप पौष्टिक असतं.. फळ, ब्रोकली, गाजर अशा भाज्या ते खातात...... पुढे छोट्याशा तलावात 4-5 मोठी कासव होती. त्यांना खाऊ घालण्यासाठी छोटी छोटी फिशेस बॉल मध्ये आम्हाला दिली... आम्ही ती त्यांना खाऊ घातली.. छोटासा फिश घेऊन पाण्यात थोडासा हात हलविला कि तो कासव जवळ येऊन तो फिश कॅच करायचा.

पुढे आम्ही बर्ड झू बघीतला खुप सुंदर सुंदर पक्षी होते तिथे.. लाल, हिरवी, पिवळे parrots, वटवाघूळ, बदक, मोर.. बऱ्याच पक्षांचे तर नाव पण सांगणं कठीण.. त्यांना खाण्यासाठी crackers, फळ आणि पाणी ठेवण्यात आली होती.. पपई पोपट खुप मस्त खात होती.

पुढे होता मोठा धमाका...किड्स स्प्लॅश पूल हर्षचा फेव्हरेट पार्ट.. त्याला पाणी खेळायला प्रचंड आवडत आणि तिथे छोटासा वॉटरपार्क च होता.. हर्षने तो एन्जॉय केला खुप खेळून झाल्यावर तिथल्याच कॅफे मध्ये पेटपूजा करून आम्ही निघालो घरी.. जाताजाता मला ते साप पुन्हा दिसलें आणि मला हा चान्स पुन्हा भेटणार नाही अस मनात विचार करून मी पण त्याला हातावर घेऊन एक फोटो काढलाच..

तुम्ही सुद्धा कुला पार्क ची ट्रिप वाचून एन्जॉय केली असेलतर बघायला नक्की या माझ्या youtube चॅनल वर.. फिजी मधला इंडिया या फेसबुक पेज ला व्हिसिट नक्की करा.. 

थँक यू 
🥰🥰🥰

Thursday 3 September 2020

फिजीमधला गणेशोत्सव (पार्ट 4)

Priya

 फिजीमध्ये कोरोना नाही आहे म्हणून सगळं नॉर्मल चालू आहे पण फिजीमध्ये बऱ्याचशा गोष्टी या दुसऱ्या देशांमधून मागवण्यात येतात... मोस्टली भारतातल्या खूप वस्तू इम्पोर्ट होतात इकडे.. अगदी मोठ-मोठ्या गणेश मूर्ती ही इम्पोर्ट होतात.

इथे गणेश स्थापना ही विष्णू टेम्पल मध्ये होते.. विष्णू टेम्पल हे हिंदू टेम्पल आहे  सगळे हिंदू देव देवता आहे.. गणेश स्थापना झाल्यानंतर सायंकाळी रोज 1ते दीड तास गणपती आणि लक्ष्मी पूजा होते त्यासाठी सगळी लोक गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे साहित्य घेऊन येतात जसं कि छोटी गणेश मूर्ती, पंचामृत, फुल, ताम्हण 21 लाडू किंवा काहीतरी गोड प्रसाद वगैरे तशी लीस्ट
फिजीमधले गणपती बाप्पा 

च दिलेली असते आणि ती लीस्ट फेसबुक आणि viber वर पाठवली जाते.. हो इकडची लोक व्हाट्सअप नाही viber वापरतात. 7 व्या दिवशी गणपतीची पूजा झाली कि दीप दान पूजा होते.. 9 व्या दिवशी हवन होतो... आणि वाराप्रमाणे रंग ठरलेले आहे... त्या त्या दिवशी त्या रंगाचे कपडे घालून यायचे.. जसं कि सोमवारी पांढऱ्या रंगाचे, मंगळवारी लाल, बुधवारी हिरव्या तर गुरुवारी पिवळ्या, शुक्रवारी मल्टिकलर, शनिवारी निळा आणि रविवारी तांबड्या रंगाचे.... गुरुजीं माईक वरून सांगतील तशी पूजा करायची.. नवरा आणि बायको त्यांची त्यांची सेपरेट पूजा मांडतात.
 
पूजेची तयारी 

पूजा झाली कि आरती होते आणि मग प्रसाद असतो. प्रसाद मध्ये इकडे वांगी बॅट्याची भाजी असते भाजी ला इकडे "तरकारी "बोलतात, भात,दाळ पुरी,टोमॅटो चटणी (माझी आवडती ), फणसाची भाजी, भजे ज्याला इकडे "बोन्डा" म्हणतात, डांगर, पुरी आणि ज्युस असतो प्रसाद म्हणून पूजेचे फळ असतात मोठे मोठे तुकडे केलेले.. भाज्या जरी ओळखीच्या वाटत असतील तरी त्यांची चव.. त्यांना बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तस ही माझी मम्मी म्हणते प्रसाद कुठलाही असो तो छानच लागतो. 😊 


असा हा दहा दिवसांचा दिनक्रम ठरलेला असतो आणि शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी सकाळी 10 ला आरती झाली कि मिरवणूक निघते आणि दुपारी 4-5 पर्यंत मिरवणूक बीच वर पोहचते..मिरवणुकीत सगळे खुप नाचतात... मागच्या वेळी मी मिस केली होती मिरवणूक ती मी या वेळी नक्की बघेल.. बीचवर बोटीमध्ये सगळे बसून खुप आतमध्ये जाऊन तिथे बाप्पाचे विसर्जन होते.आणि मग महाप्रसाद होतो मंदिरामध्ये  असा हा फिजीचा गणेशोत्सव साजरा होतो.