Friday 28 August 2020

फिजीमधला गणेशोत्सव (पार्ट 1)

माहेरी गणपती बसवतात पण सासरी नाही.. आणि माझे गणपती बाप्पा म्हणजे खुप आवडते देव अगदी लहानपणापासूनच गणेश चतुर्थी ला उपवास करणं मग सायंकाळी गणपतीच्या इच्छामणी मंदिरात दर्शनाला जाण.. नाशिककरांना चांगलंच माहित असणार इच्छामणी च मंदिर... बाप्पासाठी 21दुर्वा.. 21मोदक करणं... चंद्रोदय झाला की आरती करून उपवास सोडणं.. आमची पूर्ण फॅमिली म्हणजे मम्मी पप्पा मी आमच्या तिघांचा हा चतुर्थी चा ठरलेला प्लॅन असायचा... भाऊ दुसऱ्या शहरात जॉब करायचा म्हणून तो नसायचा पण घरी आला की तोपण आमच्यात सामील व्हायचा.

 गणेशात्सव मध्ये तर आपण बाप्पाच घरी आणतो.. सो ती तर किती भारी गोष्ट.. सगळ्यांनी मिळून डेकोरेशन करायचं.. आवडती सुंदर बाप्पाची मूर्ती घरी आणायची.. सगळी गणेश स्थापनेची तयारी.. नैवद्य.. रांगोळी.. वगैरे खूप खूप मज्जा असायची.

 आणि यापेक्षा ही मजेशीर गोष्ट अशी की आमची जॉईन फॅमिली.. म्हणजे माझे पप्पा आणि त्यांचे 4 चार भाऊ असे ते पाच भाऊ आणि त्यांची फॅमिली आम्ही सगळे सोबतच राहतो.. एक घरात नाही पण सगळ्यांचे सोबत एकसारखेच रोहाऊस आहे.. म्हणजे सगळे मिळून आमची 21-22 जणांची फॅमिली आहे. गणपती सगळ्यांच्याच घरात बसवतात.. सगळ्यांचे वेगवेगळे डेकोरेशन्स आणि वेगळ्या मूर्ती असायच्या.. means अजूनही असतात.

आपल्या घरातला बाप्पा बसवून झाला की बाकी काकांच्या घरातला बाप्पा बसवायला जायचं त्यांनी किती छान डेकोरेशन्स रांगोळी काढलीय ते बघायचे... मग खूप फोटोस काढायचे.. माझे पप्पा 2 नंबर चे भाऊ. म्हणजे मला भरपूर लहान भाऊ बहिणी.. सगळे खूप क्रिएटिव्ह.. सगळ्यांचे डेकोरेशन्स एक से बढकर एक असायचे... भारी मज्जा यायची.. पूर्ण दिवस कुठे जायचा कळायचं नाही.
            आमच्या 5 घरातले 5 गणपती बाप्पा

हे सगळं मी माहेरी आल्यावर खूप मिस करत होते.. पहिले 2 वर्ष गणपती नाही बसवण झाल आमच्या सोसायटी मध्ये पण नाही बसवला गणपती बाप्पा सगळ्यांना आपापल्या घरात बसवायचा होता... पण तिसऱ्या वर्षी मी बसवायचं अस ठरवलं.

तिसऱ्या वर्षी आम्ही फिजीमध्ये होतो.. गणेश स्थापना ची सगळी तयारी मी करून ठेवली.. 21 दुर्वा.. 21 पत्री.. 21 मोदक.. 21 भाज्यांची भाजी.. आवडते जास्वदांचं फुल वगैरे वगैरे.. आणि नवरोबा गेले मूर्ती आणायला.. पण मूर्ती कुठे भेटेना.

 इकडे सार्वजनिक मंदिरात गणपती बसवतात हे माहित होत आम्हाला सो आपल्या आपल्या घरी पण बसवत असतील.. आणि आपल्याला ही मूर्ती भेटेल अस आम्ही गृहीतच धरलं.. मग ऐन वेळी चांगलीच पंचाईत झाली आमची.. मूर्ती भेटलीच नाही. आमची फिजीमधली गणेश स्थापना होते की नाही.. गणेश मूर्ती भेटते की नाही.. भेटते तर कशी भेटते.. ते पाहुया पुढच्या भागात..

Priya

Author & Editor

Hello, I am priya currently staying in Fiji country.I am trying to write about culture of Fiji,their lifestyle,their food etc. Hope liked it.

2 comments: