Thursday 3 September 2020

फिजीमधला गणेशोत्सव (पार्ट 4)

 फिजीमध्ये कोरोना नाही आहे म्हणून सगळं नॉर्मल चालू आहे पण फिजीमध्ये बऱ्याचशा गोष्टी या दुसऱ्या देशांमधून मागवण्यात येतात... मोस्टली भारतातल्या खूप वस्तू इम्पोर्ट होतात इकडे.. अगदी मोठ-मोठ्या गणेश मूर्ती ही इम्पोर्ट होतात.

इथे गणेश स्थापना ही विष्णू टेम्पल मध्ये होते.. विष्णू टेम्पल हे हिंदू टेम्पल आहे  सगळे हिंदू देव देवता आहे.. गणेश स्थापना झाल्यानंतर सायंकाळी रोज 1ते दीड तास गणपती आणि लक्ष्मी पूजा होते त्यासाठी सगळी लोक गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे साहित्य घेऊन येतात जसं कि छोटी गणेश मूर्ती, पंचामृत, फुल, ताम्हण 21 लाडू किंवा काहीतरी गोड प्रसाद वगैरे तशी लीस्ट
फिजीमधले गणपती बाप्पा 

च दिलेली असते आणि ती लीस्ट फेसबुक आणि viber वर पाठवली जाते.. हो इकडची लोक व्हाट्सअप नाही viber वापरतात. 7 व्या दिवशी गणपतीची पूजा झाली कि दीप दान पूजा होते.. 9 व्या दिवशी हवन होतो... आणि वाराप्रमाणे रंग ठरलेले आहे... त्या त्या दिवशी त्या रंगाचे कपडे घालून यायचे.. जसं कि सोमवारी पांढऱ्या रंगाचे, मंगळवारी लाल, बुधवारी हिरव्या तर गुरुवारी पिवळ्या, शुक्रवारी मल्टिकलर, शनिवारी निळा आणि रविवारी तांबड्या रंगाचे.... गुरुजीं माईक वरून सांगतील तशी पूजा करायची.. नवरा आणि बायको त्यांची त्यांची सेपरेट पूजा मांडतात.
 
पूजेची तयारी 

पूजा झाली कि आरती होते आणि मग प्रसाद असतो. प्रसाद मध्ये इकडे वांगी बॅट्याची भाजी असते भाजी ला इकडे "तरकारी "बोलतात, भात,दाळ पुरी,टोमॅटो चटणी (माझी आवडती ), फणसाची भाजी, भजे ज्याला इकडे "बोन्डा" म्हणतात, डांगर, पुरी आणि ज्युस असतो प्रसाद म्हणून पूजेचे फळ असतात मोठे मोठे तुकडे केलेले.. भाज्या जरी ओळखीच्या वाटत असतील तरी त्यांची चव.. त्यांना बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तस ही माझी मम्मी म्हणते प्रसाद कुठलाही असो तो छानच लागतो. 😊 


असा हा दहा दिवसांचा दिनक्रम ठरलेला असतो आणि शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी सकाळी 10 ला आरती झाली कि मिरवणूक निघते आणि दुपारी 4-5 पर्यंत मिरवणूक बीच वर पोहचते..मिरवणुकीत सगळे खुप नाचतात... मागच्या वेळी मी मिस केली होती मिरवणूक ती मी या वेळी नक्की बघेल.. बीचवर बोटीमध्ये सगळे बसून खुप आतमध्ये जाऊन तिथे बाप्पाचे विसर्जन होते.आणि मग महाप्रसाद होतो मंदिरामध्ये  असा हा फिजीचा गणेशोत्सव साजरा होतो. 

Priya

Author & Editor

Hello, I am priya currently staying in Fiji country.I am trying to write about culture of Fiji,their lifestyle,their food etc. Hope liked it.

0 comments:

Post a Comment