बुला, वेलकम तो फिजी
फिजी आइसलँड हा देश छोट्या मोठ्या अशा 530 आईसलॅंड्स मिळून तयार झालेला देश आहे. फिजी हा देश पॅसिफिक महासागरामध्ये आहे.फिजीच्या जवळ न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलिया हे देश आहे. फोटोमध्ये जगाच्या नकाशामध्ये जे दोन रेड डॉट दिसताय तो आहे फिजी देश.
530 आईसलॅंड्स पैकी दोन आइसलँड सगळ्यात मोठी आहेत viti levu आणि venua levu... आम्ही viti levu मध्ये lautoka या सिटी मध्ये राहतोय.आणि आमच्या एरिया च नाव आहे काश्मीर.फिजी ची कॅपिटल सिटी suva आहे. फिजीची 80 percent पॉपुलशन ही या दोन आइसलँडस वरतीच आहे. फिजीची लोकसंख्या जवळपास 10लाख एवढी आहे.
भारतातून फिजीला येण्यासाठी डायरेक्ट फ्लाईट नाही आहे. आपल्याला connecting flight घेऊन याव लागत. म्हणजे भारत ते सिंगापुर or हॉंगकॉंग आणि मग तिथून फिजी अस यावं लागत. मला फिजी मध्ये येऊन दोन वर्ष झाली हे तिसरं वर्ष चालू आहे. आणि गंम्मत म्हणजे इथे चक्क हिंदी बोलतात.. इथे 3 भाषा बोलल्या जातात. इंग्लिश, फिजियन आणि हिंदी.. इथली हिंदी थोडीशी वेगळी आहे.. पण आपण ती समजू शकतो अशीच आहे.
आणि अजून एक गंम्मत म्हणजे फिजी च्या पूर्ण लोकसंख्येपैकी 40%लोक ही भारतीय आहेत. जे पिढ्यानपिढ्या पासून फिजीमध्येच राहताय. त्या लोकांना इंडोफिजियन असेही म्हणतात.. एवढी इंडोफिजीयन लोक इथे कशी केव्हा आली यामागे पण एक स्टोरी आहे मी ती तुम्हांला सांगेल च पुढे. आणि तुम्हांला फिजीमध्ये खूप साऱ्या भारतीय शब्द ऐकायला भेटतील. एवढच काय तर फिजीला छोटा भारत असेही म्हणू शकतो आपण.
फिजी हा खूप सुंदर देश आहे...इट्स अ पॅराडाइस... .इथे खूप सारी ग्रीनरी, बीचेस, रिसॉर्टस आणि आपल्या मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह सारखा इथे सुद्धा खूप सुंदर मरीन ड्राईव्ह आहे. इथली लोक खूप फ्रेंडली आणि आनंदी असणारी लोक आहेत. फिजीच्या सुंदरतेबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे.
फिजी हा देश चारही बाजूने पाण्याने वेढलेला आहे म्हणूनच त्याला islands म्हणतात. पाण्यामध्ये असल्यामुळे या देशाने बाकी दुसऱ्या देशासोबत बॉउंडरी शेअर नाही केलेली.
माझ्या हिंदीच्या टोन वरून आणि कपड्यांवरून बहुतेक त्यांना कळत की मी फिजियन नसावी.. म्हणून ते मला विचारतात "आप कहासे हो? " मग मी सांगते इंडिया मग ते विचारतात "wow इंडियामे कहासे? ""आपको अच्छा लगता हे क्या यहापे?? " आणि असे अनेक प्रश्न विचारले जाता नेहमी.
बेसिकली इथल्या लोकांना भारतीय लोकांचं...भारताच खूप कौतुक आहे.. त्याला कारण ही तस आहे.. कारण त्यांचे पूर्वज भारतीय होते... त्यांनी बघितलेला इंडिया म्हणजे फक्त फिल्म्समधला इंडिया त्यांनी प्रत्यक्षात अजून इंडिया बघितलेला नाही.. काही लोकांनी बघीतला आहे तसा पण ते बोटावर मोजण्याइतपतच लोकांनी .
इकडे साऊथ आणि गुजरात साईड चे लोक जास्त आहेत. गुजराती लोक गुजराती भाषा बोलतात पण साऊथ ची लोक नाही बोलत तामिळ, मद्रासी भाषा. आम्ही महाराष्ट्राचे त्यामुळे आम्ही मराठी बोलतो. सो त्यांना अस वाटत की आम्ही तामिळ च बोलतोय की काय.
फिजी च्या अशाच गंमतीजमती बघू आपण पुढच्या भागात.. हा भाग कसा वाटला? फिजीबद्दल तुम्हांला आणखी काय जाणून घ्यायला आवडेल हे कंमेंट्स मध्ये नक्की कळवा.
Monday, 27 July 2020

Priya
Author & Editor
Hello, I am priya currently staying in Fiji country.I am trying to write about culture of Fiji,their lifestyle,their food etc. Hope liked it.
What's Related
July 27, 2020
Fiji iceland
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment