हरतालिका व्रत हे सगळ्याच मुलींच्या... बायकांच्या मनाजवळचा सण.. मनासारखा चांगला नवरा मिळावा म्हणून हे व्रत अगदी लहानपणा पासूनच मुली करतात.. आणि लग्न झाल्यावर मिळालेला नवरा मनासारखा आणि चांगला वागवा म्हणून करत असतील कदाचित.. 😉
आपल्या देशात सण साजरे करणं किती सोपं असत जो सण असतो त्याच्या पूजेचे साहित्य बाजारातुन घेऊन यायचं... ते सगळ घेऊन मस्त नटून थटून मंदिरात जायचं आणि गुरुजीं सांगतील तशी पूजा करायची की झाली पूजा..
पण खरी मज्जा तेव्हा होते जेव्हा हेच सण दुसऱ्या देशात साजरे करायचे असतात... कितीही दूर राहत असलो तरी आपली संस्कृती आपले सण विसरून कस चालेल.. पण इथे सगळ पूजेचे साहित्याची जुळवाजुळव करायची म्हटलं की 1-2 आठवडा आधीच तयारी करावी लागते..
पूजेची तयारी
फिजीला येऊन मला 3-4 महिनेच झाले होते.. आणि हरतालिकेच व्रत.. पूजा मला करायचीच होती..आणि पूजा होती 2 दिवसांवर.. मग पूजेबद्दल सगळी माहिती मी आईला फोन वर विचारून घेतली .. कोण कोणती पत्री वाहतात.. पूजा कशी मांडतात...तिला ही सगळ्या पत्रींची नाव माहित नव्हती..मग तिने मला एक पुस्तकात लिहलेल्या हरतालिका व्रताची माहिती, हरतालिकेची आरती याचा फोटो पाठवला.. त्यात देखील सगळी माहिती नव्हती मग गुगल वर search करून कोणकोणती पत्री वाहतात याची लिस्ट बनवली.. पूजेचे साहित्य काय काय लागणार याची लिस्ट बनवली..आणि लागले कामाला..
केळीचे खांब आणि शिवलिंग बनवण्यासाठी वाळू नवरोबाला आणायला सांगितली.. ते त्यांनी ऑफिस वरून घरी येताना घेउनच आले.. ते येताच मैत्रिणीकडे गेले तिच्या गार्डन मध्ये खूप झाड आणि फुल होती.. तिच्याकडून खूप सारी फुल, नागलीची पान भेटणार नाही म्हणून आंब्याची पान.. अशोकाची पान आणली.. 5 फळ घरात होतीच..दुर्वा, आघाडा, तुळस घरच्या अंगणातच भेटले.. चाफा, डाळिंब, बेल, रुई शेजारच्या घरी भेटले.. बाकी धोत्रा, कन्हेरे, बकुळ, जाई शोधली पण नाही भेटली... खण आणि शृंगार साहित्य सुपरमार्केट मध्ये भेटले.. सुपारी आणि हळकुंड तिथे नाही भेटले म्हणून दुसरऱ्या भारतीय दुकानांमधून घेतले... पण तिथे पण हळकुंड नाही भेटले..
पूजा मांडणी
इथे सगळे म्हणजे सगळेच शॉप्स ऑफिसेस सायंकाळी 5 ला बंद होतात..म्हणजे जो पर्यंत नवरा ऑफिस वरून घरी येऊन आम्हाला घेऊन जाणार तोपर्यंत सगळेच दुकान बंद होतात..म्हणून जे काही घ्यायचं ते फक्त शनिवारी दुपारी.. तो पण हाल्फ डे असतो म्हणून शक्य होत... पण तेव्हा पण खूप ऊन असत लहान मुलाला त्या उन्हात घेऊन फिरणं म्हणजे आजाराला निमंत्रण.. आणि अशी ही सगळी मेहनत करून तयारी करून ठेवली आदल्या दिवशी.. तेव्हा कुठे दुसऱ्या दिवशी माझी पूजा झाली..
पूजेच्या दिवशी लवकर उठून पूजा करायची होती नाहीतर मुलगा उठला तर त्याने दिवसभर पूजा होऊच दिली नसती माझी.. कधी देवघरातला गणपती, कधी बाळकृष्ण् घेऊन तर कधी घंटी घेऊन पळतो तो.. त्या दिवशी उशीरा उठला म्हणून माझी पूजा छान झाली..
हरतालिका पूजा
एकुलती एक साडी घेऊन आलेले इंडिया वरून ती नेसली.. केळीचे 4 खांब चौरंगाला बांधले.. चौरंग नाही तसा.. पण चौरंग सारखाच पण त्यापेक्षा थोडा उंच टेबल होता त्यावरच मी माझं देवघर बनविलेल.. त्यावर केळीच पान अंथरून त्यावर वाळूच शिवलिंग बनवील.. शेजारी पार्वती आणि तिच्या सखी मांडल्या.. समोर आंब्याची पाच पान मांडली.. त्यावर 1-1 रुपया ऐवजी.. 1-1 डॉलर ठेवला.. त्यावर सुपारी.. खारीक नाही भेटलं म्हणून खजूर.. बदाम कडक वाला पूजेचा बदाम नाही भेटला म्हणून.. नेहमीचा बदाम ठेवला . हळकुंड तेवढा नाही भेटलं.. गूळ खोबऱ्याचा नैवद्य तयार ठेवला आणि बाकी सगळी पूजा youtube वर बघुन केली.. अशी ही माझी फिजीमधली पहिली मजेशीर हरतालिका माझ्या नेहमीच लक्षात राहील.. आणि ती करण्यासाठी किती पळापळ केली हे पण लक्षात राहील.. आता ही माझी दुसरी हरतालिका.. तशी ती अजून 4 दिवसांनी आहे पण त्याची तयारी मी आत्ताच चालू केलीय.. 😅
Mastach
ReplyDeleteThank u 😊
DeleteThat's awesome priya
ReplyDeleteThank u 😊
Delete