गणेश मूर्ती भेटत नव्हती कुठेच पण नवरोबा ही खूप हुशार त्यांनी मूर्ती शोधून आणलीच.. आणि आमची छान गणेश स्थापना झाली.. अगदी भारतातले गुरुजीं येऊन बसवून गेले गणपती.. थँक्स to youtube 😜😅
आमच्या ह्यांना गोड पदार्थ खूप आवडतात.. मोदक ही आवडीचे.. सो त्यांच्यासाठी तर मेजवानीच होती रोज नवीन गोड पदार्थ नैवद्याला असायचे ..फिजी मध्ये आमचे शेजारी हे राधाकृष्ण टेम्पल मधले गुरुजीं होते.. ते नेहमीच माझ्या मुलाला प्रसाद द्यायचे.. मग मी ही त्यांना आपले भारतीय स्टाइल मोदक चा प्रसाद खाऊ घातला त्यांनाही तो खूप आवडला. असेच दहा दिवस कसे गेले कळलेच नाही.. आणि मग दहाव्या दिवशी विसर्जन करण्यासाठी बीच वर गेलो..
तेव्हा आपली भारतातली मिरवणूक आठवली.. किती तुफान आणि जल्लोशात निघायची मिरवणूक. आम्हाला वाटलं बीच वर कुणी नसेल पण येऊन बघतो तर काय बीच पूर्ण भरलेला... सजवलेला ट्रक...खूप सारे लोक आणि गाड्या...मोठी गणेश मूर्ती होती .. ढोल ताशा वाजत होता.. गुलाल उधळत होते.. फिजी मध्ये जो सार्वजनिक गणपती बसवतात त्या लोकांची ही गर्दी होतो.. आम्हाला ते बघुन खूप आनंद झाला.. इथे पण गणेशोत्सव थाटामाटात होतो हे बघुन खूप भारी वाटलं.
मोठी आणि खूप सुंदर गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणली होती... सगळ्यांनी मिळून तिची आरती केली आम्ही पण त्यात सामील झालो.. मग एक बोट आली आणि त्या बोटीत सगळ्या माणसांनी मिळून हळूहळू ती गणेश मूर्ती बोटीमध्ये नेली आणि त्यानंतर सगळे लोक बोटीमध्ये चढले.. मला ही खूप जावस वाटत होत पण माझा 1 वर्षाचा मुलगा होता सोबत आणि बोटीमध्ये गर्दी होती.. बोट किती आत जाईल किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता.. म्हणून नाही जाता आलं.
आणि ती बोट गेली समुद्रात अगदी दिसेनाशी होईपर्यंत आत गेली.. सगळी लोक बोटीमध्ये नाही बसले उरलेलं लोक बीच वरच होते... आम्हांला आमच्या बाप्पाचं विसर्जन करायचं होत.. पण इथे करावं की नाही करू असे झालेलं.. कारण आमची गणेश मूर्ती इको फ्रेंडली होती.. आणि ती बुडाली नाही तर...कुणी ओरडलं तर.. असे विचार मनात आले... फिजी खूप क्लीन country आहे म्हणूनच विसर्जनासाठी ते एवढे आत गेले असावे.. म्हणून आम्ही बीच वरून मॅरीन ड्राईव्ह ला आलो आणि तिथे गणेशविसर्जन केल. आणि मूर्ती विसर्जित झाली.
पण मनाला ही गोष्ट लागली आणि तेव्हाच 1 गोष्ट ठरविली की पुढच्या वर्षी गणपती हा इको फ्रेंडली च बसवायचा... आणि ते मी पूर्ण ही केल या वर्षी मी इको फ्रेंडली गणपती घरी बनवला आणि त्याची स्थापना केली.
माझ्या इको फ्रेंडली गणपती ची गोष्ट वाचू पुढच्या भागात...
गणेशोत्सव 2019
0 comments:
Post a Comment