मागच्या वर्षी ठरवलं तर खरं कि मी इको फ्रेंडली गणपती बाप्पा बसवेल.. घरीच गणपती बाप्पा बनवेल.. पण ते इतकं काही सोपं नव्हतं.. इको फ्रेंडली म्हटलं म्हणजे शाडू माती हवी पण ती तर इथे म्हणजे फिजीला भेटणार नाही.. साध्या मातीचा बनवला तर तो दहा दिवस तसाच राहिला हवा.. भेगा पडल्या तर.. म्हणून दुसरा ऑपशन बघीतला पिठाचा आणि हळदीचा गणपती पण तो ही दहा दिवस तसाच राहिला हवा.. मुंग्या वगैरे लागल्या किंवा पीठ खराब झाल तर अशी मनात शंका होती.
मग अजून एक ऑपशन भेटला सोप आणि कॉर्नफ्लोर चा बाप्पा.. हा ऑपशन छान वाटला.. वेगवेगळ्या रंगाचे सोप होतेच माझ्याकडे.. मग गणेश स्थापना च्या आदल्या दिवशी बनवायला घेतला.. एक एक रंगाचा सोप किसून त्यात कॉर्नफ्लोर मिक्स करून बनवायला सुरुवात केली.. बेस छान बनला.. पाय पण खूप छान जमले.. मग कॉर्न फ्लोर संपलं मग दुसऱ्या दिवशी राहिलेली मूर्ती पूर्ण करायच ठरविल.. नवरोबाला बाप्पा चे पाय खूप आवडले.
मग त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर कॉर्नफ्लोर आनून दिले आणि मग सगळं काम पटकन आवरून लहान मुलाला झोपवून लागले बाप्पाची मूर्ती बनवायला.. मला बघुन नवरोबाही जॉईन झाले.. आणि दोघांनी मिळून छान मूर्ती बनविली आणि मग लगेच गणेश स्थापना ची तयारी ला लागले..
आमचा इको फ्रेंडली गणेशा 2020
तेवढ्यात मुलगा उठला त्याला म्हटलं हे बघ गणपती बाप्पा तर तो म्हणतो its a elephant.. ऊsss ऊsss 😅 त्याचा elephant हा आवडता प्राणी आहे.. आणि बाप्पाची सोंड बघुन तो म्हणाला elephant😀
दोघांनी मिळून छान गणपती बाप्पा ची स्थापना केली.. माझं गणपती अथर्वशिष्य पाठ आहे त्यामुळे लवकर झाली पूजा पण मध्ये मध्ये माझा मुलगा येतच होता.. पूजेसाठी ठेवलेले अँपल आणि orange त्याला हवे होते.. त्याचे फेव्हरिट फ्रुटस... त्याला nadi लावण्यासाठी मी त्याच्या आवडीचा ज्युस..शेंगदाण्याची चिक्की.. जी इथे पहिल्यांदा भेटली ती दिली.. तो ही ती चॉकलेट समजून खात बसला आणि आम्ही आमची पूजा पटकन करून घेतली... 21मोदक.. 21 भाज्यांचा नैवद्य दाखविला.. आणि त्यातच दिवस कुठे गेला कळलं नाही.. फिजीच्या सार्वजनिक गणपती बाप्पा ची स्थापना मिस झाली.. पण दुसऱ्या दिवशी दर्शनाला जायचं ठरविलं.
फिजीमध्ये कसा होतो सार्वजनिक गणेशोत्सव पाहू पुढच्या भागात..
0 comments:
Post a Comment